Thursday, July 14, 2011

पाऊस...: पाऊस...

सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पाऊस, कधी पडणार, किती पडणार, कोठे पडणार याचा फक्त अंदाज आपण घेऊ शकतो. पण अचानक आला की काय फजिती करतो सांगू, याची प्रचीती आज मला आली.
    क्लास होता म्हणुन गावात गेली म्हण्टलं काय येतो पाऊस. क्लास चांगला २ तास चालला पावसाचे नावच नाही. अगदी क्लास संपायची वेळ आली आणि याने आपले रिमझिम गाने चालु केले. येवढ्याशा पावसाने काय होणार होतं, थोडासा ओलावा आणि चिकचिक बस्स....
    पण फक्त येवढ्याशा पावसाने शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत होतात. जरा आजुबाजुला पहिलं तर हिरवळ, झाडांचं हसणं, फुलांचं फुलणं, मातीचा सुगंध हे निसर्गाचं रुप मनाच्या आसमंतात मावेनासं होतं.....
    शहराच्या पलीकडे गावाच्या अलीकडे डोंगरांचं ते सौंदर्य काय खुलुन दिसतं बरं. जेव्हा पावसाच्या पाण्याचे थेंब टिप टिप पानांवर पडतात तेव्हा त्या झाडाचं थरथरणं काय रोमांचक वाटतं....अशा दिवसांत गिर्यारोहन नक्किच करावं. खास धबधबा बघायला जाणं आणि पांढरे शुभ्र फेसाळ पाण्याकडे पहातच बसावं....

            निळा नभा तुझं हे काळं होणं..
            विजांचं हे ओरडणं आणि धो-धो कोसळंण
            धरतीमातेला सुख देणं, नटवणं, फुलवणं
            बाबा तुझ्याच रे हातात...

            जीवनाचे चित्र काढतोस तु, त्यात रंग भारतोस तु
            तुझ्या रंगांची किमया काय रंगतदार आहे
            तुझ्यामुळेच आमचे जीवन फार रंगतदार आहे... 

पाऊस...